Maharashtra Elections:दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन 

0
Maharashtra Elections:दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन 
Maharashtra Elections:दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन 

Maharashtra Elections : राज्यातील नगरपालिका (Municipality) आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची तारीख (Voting Date Announced) काल ४ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार २ डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. यासाठी सर्व तयारी झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. विरोधकांनी केलेल्या दुबार मतदानाच्या आरोपावर देखील निवडणूक आयोगाने (Election Commission) स्पष्टीकरण दिलं. संभाव्य दुबार मतदार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने डबल स्टारची स्ट्रॅटेजी (Strategy)आखली असल्याची माहिती आयोगाने दिली.

आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ही दुबार नावे शोधा व दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक बूथवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नक्की वाचा: अखेर राज्यातील नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

येणाऱ्या निवडणुकीत कसं रोखलं जाईल दुबार मतदान? (Maharashtra Elections)

आता आयाेगाने आदेश दिले आहेत की, ज्यांची दुबार म्हणजे दोनदा नावे आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जा, दोनपैकी कोणत्या ठिकाणी त्यांना मतदार म्हणून नाव हवे आहे, ते विचारा आणि उर्वरित पर्यायाच्या नावावर फुली मारा, जेणेकरून ते इतर ठिकाणी मतदान करू शकणार नाहीत. आता बूथ पातळीवरील अधिकारी हे अशा दुबार मतदारांच्या घरी जातील. इतके करूनही कुठे दुबार नाव राहिलेच असेल तर मतदार एकाच ठिकाणी मतदान करतील असे त्यांच्याकडून लिहून घेतले जाणार आहे.

अवश्य वाचा:  “राज्याचा ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही”-शरद पवार   

मतदारयादीत दोनदा नाव असलेली नावे डबल स्टारने चिन्हांकित होणार  (Maharashtra Elections)

तसेच निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, मतदारयादीत दोनदा नाव असलेली नावे डबल स्टारने चिन्हांकित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार डबल स्टार असणाऱ्या मतदाराला इतर ठिकाणी मतदान करणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे. डबल स्टार असणाऱ्या मतदाराला बोटाला शाई लावलेली असल्याने दुसरीकडे  मतदान करता येणार नाही. ज्या मतदाराच्या नावापुढे डबल स्टार असेल तो कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहे ,याची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार त्याने मतदान केल्यानंतर तशी माहिती दुसऱ्या केंद्रावर देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल आहे.