Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

0
Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त
Elections : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Elections : नगर : जिल्ह्यातील नगरपरिषदा (Municipal Council) व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी (Election Decision Officer) व सहायक निवडणूक (Elections) निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

निवडणुकीदरम्यान मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार

निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक (Elections)

जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे. संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील. जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, पाथर्डी नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील. राहाता नगर परिषदेकरिता मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील. राहुरी नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार, राहुरी) नेमले गेले आहेत.


देवळाली प्रवरा नगरपरिषदेकरिता गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील. नेवासा नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील. शिर्डी नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतीश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे.

श्रीगोंदा नगर परिषदेकरिता श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील. सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.