Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घोटण येथे आंदोलन

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घोटण येथे आंदोलन

0
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घोटण येथे आंदोलन
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे घोटण येथे आंदोलन

Swabhimani Shetkari Sanghatana : शेवगाव : ऊसाला (Sugarcane) तीन हजार तीनशे रुपये भाव जाहीर करावा, मागील वर्षीचे 300 रुपये द्यावेत तसेच काट्यामध्ये होणारी काटेमारी थांबवावी, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्त्यांकडून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) व जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटण या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

काही कारखान्यांनी उसाचे दर जाहीर न केल्यामुळे आंदोलन

उसाच्या चालू गळीत हंगामामध्ये ऊस कारखानदारांनी ऊसाला तीन हजार तीनशे रुपये भावजाहीर करावा व मागील वर्षीचा राहिलेला फरक द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नियमानुसार ऊस कारखाने सुरू होण्याअगोदर ऊस दर जाहीर करणे अपेक्षित असते. परंतु काही कारखान्यांनी आपले उसाचे दर जाहीर न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा पवित्रा घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष लवांडे यांनी सांगितले.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

तसेच ते यावेळी बोलताना म्हणाले की, (Swabhimani Shetkari Sanghatana)

काही साखर कारखान्याचे वजन काटे हे फॉल्टी असल्याकारणाने त्यांचे वजन काटे हे वजन निरीक्षक यांच्याकडून तपासून घ्यावेत, तसेच शेतकऱ्यांना आपल्या उसाचा कोणत्याही काट्यावर वजन करण्याचा अधिकार असावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.