All India Open Chess Tournament : नगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shanti Kumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा (All India Open Chess Tournament) अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे उत्साहात सुरू झाली. या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनुप देशमुख यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले.
यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, स्वप्निल भंगुरकर, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, रोहित आडकर, देवेंद्र ढोकळे, सुनील जोशी, संजय खडके, अनुराधा बापट, रोहिणी आडकर तसेच पंच विनिता श्रोत्री (पुणे), श्रद्धा वीचवेकर (पुणे), पवन राठी (सोलापूर), शार्दुल टापसे (सातारा), शिरीष इंदुरकर (नागपूर), विजय चोरडिया (पुणे), प्रवीण जोशी (संभाजीनगर) यांच्यासह खेळाडू, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन
सचिव यशवंत बापट म्हणाले की,
या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आतापर्यंत अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, रायगड तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल येथून मिळून २७० खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे ही स्पर्धा दर्जेदार आणि रोमहर्षक ठरणार आहे.
नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू
अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (All India Open Chess Tournament)
शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन तर्फे आयोजित या क्लासिकल फेडरेशन चेस टूर्नामेंट २०२५ मध्ये सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी होत आहेत. साडेपाच वर्षांचा सर्वात लहान बुद्धिबळपटू आणि ८३ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेत आपली बुद्धी आणि कौशल्य आजमावणार आहेत. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा मानस म्हणजेच शहरातून जास्तीत जास्त ग्रँडमास्टर घडवणे, आणि होतकरू व तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन करणे. ह्या अतिशय दर्जेदार खेळाडू सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे तर प्रकाश गुजराथी यांनी आभार मानले.



