नगर : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर (Indurikar Maharaj) हे कायम आपल्या किर्तनांमुळे चर्चेत असतात. विनोदी शैलीमध्ये ते आपलं म्हणणं किर्तनासाठी आलेल्या श्रोत्यांना पटून देतात. लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात. काल (ता.४) इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा (Daughter Engagement) पार पडला आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral video) झाले आहेत.
नक्की वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन
संगमनेरमध्ये पार पडला साखरपुडा (Indurikar Maharaj daughter Engagement)

इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा संगमनेरमध्ये पार पडला.या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश होता. या साखरपुड्यात सत्कार, हार, तुरे, शाल न स्विकारता हा कार्यक्रम पार पडला.
अवश्य वाचा: ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला गोव्यात सुरवात
इंदुरीकर महाराजांचा जावई नेमका आहे कोण? (Indurikar Maharaj daughter Engagement)

इंदुरीकर महाराज यांच्या जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे. साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे रहिवासी आहेत. ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. सध्या ते नवी मुंबईत व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहेत. साहिल चिलप यांच्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे शेकडो ट्रक आणि व्यावसायिक वाहने असल्याची माहिती समोर आली आहे.



