Satara Doctor Death Case : साताऱ्यातील (Satara) फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण (Female doctor suicide case) हे राज्यात मोठा चर्चेचा विषय बनले आहे. बीडमधील एका डॉक्टर तरूणीने तळ हातावर सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली होती. यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेच्या (Gopal Badane) नावाचा उल्लेख करण्यात आला होता. आता गोपाळ बदनेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात बदनेचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर बदनेला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते.
नक्की वाचा: ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला गोव्यात सुरवात
गोपाळ बदनेवर सर्वात मोठी कारवाई (Satara Doctor Death Case)
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून केले बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मालिन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.
अवश्य वाचा: इंदुरीकर महाराजांचा जावई नेमका आहे कोण ?
हातावर सुसाईड नोट लिहीत महिला डॉक्टरने केली आत्महत्या (Satara Doctor Death Case)
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहीली होती. माझ्या मृत्यूसाठी PSI गोपाळ बदने हा जबाबदार आहे, त्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच, प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं महिला डॉक्टरने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं. गोपाल बदनेचे इतरही अनेक कारनामे समोर आले होते. त्याने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला होता अशी माहिती समोर आली आहे.



