Deputy Chief Minister : पारनेर-सुपा रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती; उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे धिम्या प्रशासनाला जाग

Deputy Chief Minister : पारनेर-सुपा रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती; उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे धिम्या प्रशासनाला जाग

0
Deputy Chief Minister : पारनेर-सुपा रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती; उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे धिम्या प्रशासनाला जाग
Deputy Chief Minister : पारनेर-सुपा रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती; उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे धिम्या प्रशासनाला जाग

Deputy Chief Minister : पारनेर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गुरुवारी (ता.६) होणाऱ्या पारनेर शहरातील दौऱ्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) अखेर पारनेर-सुपा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. सर्वसामान्य नागरिक गेली कित्येक दिवस प्रशासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने मागणी करत होते. मात्र, सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या धिम्या प्रशासनाला अखेर उपमुख्यमंत्र्यांच्या (Deputy Chief Minister) आगमनामुळे जाग आली आहे.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

त्यावेळी केवळ बारीक खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी

दसरा सणाच्या निमित्ताने राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पारनेर शहरात कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता, सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यावेळी डांबरी रस्त्यांवर केवळ बारीक खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती, ज्यामुळे रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी ‘धुळीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली वारंवार वृत्तांकन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संबंधित विभागाने केवळ एडीसीसी बँक ते ग्रामीण रुग्णालय पर्यंतच्या रस्त्यावर थातुरमातुर पाणी मारण्याचे काम केले.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष (Deputy Chief Minister)

मात्र, या रस्त्यावरील वाहनधारकांना छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता, तरीही नागरिकांच्या या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरेसा वेळ दिला नाही आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले.  मंत्र्यांच्या आगमनाचा परिणाम सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अनेकदा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परंतु शहरात एखाद्या मंत्र्याचे आगमन होणार असेल, तर मात्र प्रशासन तातडीने कामाला लागते, असा अनुभव पारनेरकरांना आला आहे.

गेले कित्येक दिवस नागरिक रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाचे उंबरे झिजवत होते. वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने आता उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे तातडीने पारनेर-सुपा रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या महत्त्वाच्या रस्त्याला आता पुन्हा चांगले दिवस आले आहेत. नागरिकांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर का होईना, रस्ता दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यासाठीच काम न करता, प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या समस्यांकडेही तेवढ्याच तत्परतेने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.