Suicide : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

Suicide : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

0
Suicide : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला
Suicide : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

Suicide : पाथर्डी : तालुक्यात बुधवारी (ता.५) आत्महत्यांच्या सलग घटनांनी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील घाटशिरस येथे नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास (Suicide) घेऊन जीवनाचा अंत केला, तर पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात एका २८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तसेच साकेगाव येथील ३० वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केल्यानंतर बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. या चौघांच्या मृत्यूमुळे पाथर्डी तालुक्यात (Pathardi) हळहळ व्यक्त होत आहे.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या दांपत्याची आत्महत्या

घाटशिरस येथील भाउसाहेब शिवराम माळी (वय २५) आणि त्यांची पत्नी प्रियंका भाउसाहेब माळी (वय १९) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा विवाह केवळ वर्षभरापूर्वी झाला होता. बुधवारी सकाळी गावच्या शिवारात दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे करीत आहेत. दरम्यान, पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात संजना सुनिल खुडे (वय २८, रा. नाथनगर) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजनाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल वैभव साळवे हे करीत आहेत.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

चार ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात भीती

तसेच साकेगाव येथील अंबादास पाराजी वाघ (वय ३०) या युवकाने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १.१० वाजता विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, पाच दिवस उपचार सुरू असताना बुधवारी (ता.५) पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे हे करीत आहेत. एकाच दिवशी तालुक्यात चार ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.