Crime : बुऱ्हाणनगर परिसरात दोन गटात हाणामारी; पाच जखमी, गुन्हा दाखल

Crime : बुऱ्हाणनगर परिसरात दोन गटात हाणामारी; पाच जखमी, गुन्हा दाखल

0
Crime : बुऱ्हाणनगर परिसरात दोन गटात हाणामारी; पाच जखमी, गुन्हा दाखल
Crime : बुऱ्हाणनगर परिसरात दोन गटात हाणामारी; पाच जखमी, गुन्हा दाखल

Crime : नगर : पैशाच्या व्यवहारातून दोन गटात लाकडी दांडके आणि दगडाने हाणामारी (Beating) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुऱ्हाणनगर (Burhannagar) परिसरात (ता. अहिल्यानगर) येथे घडली आहे. मारहाणीत दोन्ही गटाचे पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत.

अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील

संशयित आरोपींची नावे

पहिली किफावत काळे (वय २५, रा. डेअरी फार्म, सैनिकनगर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह वैशाली शर्मा काळे, त्रेजीली शर्मा काळे (सर्व रा. डेअरी फार्म, सैनिकनगर, भिंगार) जखमी झाले आहेत. जाशा परेवाला काळे (रा. बुऱ्हाणनगर), शकत्या युवराज काळे (रा. अकोळनेर, ता. अहिल्यानगर) व हरिष युवराज काळे (रा. डेअरी फार्म, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण (Crime)

फिर्याद सुरेश सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरेश काळे व त्यांच्या कुटुंबातील वैशाली काळे, त्रेजीली काळे हे सर्व बुऱ्हाणनगर व्हिडीओकॉन शिवारातील कंपनीजवळ असताना संशयित आरोपी त्या ठिकाणी गेले. त्यांनी पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोन महिलांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या गटाच्या शक्ती युवराज काळे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताज्या पाच्या भोसले, अभिकान किरण भोसले, सुरेश किफावत काळे, विशाल शर्मा काळे (सर्व रा. डेअरी फार्म, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.