Flood Affected : पूरग्रस्तांसाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ७१ हजारांची मदत सुपूर्द

Flood Affected : पूरग्रस्तांसाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ७१ हजारांची मदत सुपूर्द

0
Flood Affected : पूरग्रस्तांसाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ७१ हजारांची मदत सुपूर्द
Flood Affected : पूरग्रस्तांसाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ७१ हजारांची मदत सुपूर्द

Flood Affected : नगर : राज्यातील पूरग्रस्तांना (Flood Affected) मदतीचा हात देण्यासाठी जिल्ह्यातील विविध संस्था, अधिकारी व विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांना दिलासा मिळावा या उद्देशाने वस्तू व सेवा कर विभाग (Goods and Services Tax Department) (विक्रीकर) महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra), अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकूण ७१ हजार १०१ रकमेचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.

अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील

रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपुर्द

यावेळी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आर. एन. जाधव, ए. जे. राख, सी. एन. कडेपल्ली, पी. एन. रसाळ, वी. एन. लखायती, के. एम. साळुंके, जी. आर. निमसे, आर. एन. दरोळे व दि. एम. गारगुंड यांचा समावेश आहे. सर्वांनी एकत्रितपणे ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपुर्द केली.

नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात सहभागी (Flood Affected)

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील प. पु. गगणगिरी महाराज विद्यालय, पिंपरणे येथील विद्यार्थ्यांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात सहभागी होऊन गावात फिरून १५ हजार ३६६ इतकी रक्कम जमा केली. ही रक्कम डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात शाळेचे मुख्याध्यापक यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे सुपूर्द केली.