Manoj Jarange Patil:धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील केली ;मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

0
Manoj Jarange Patil:धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील केली ;मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil:धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील केली ;मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले, मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली होती, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केला आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत हा धक्कादायक खुलासा केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरा मेसेज देणे गरजेचे होते. मी कालच मराठा समाजाला आवाहन केलं आहे की, आपण शांत राहायचं आहे. मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की, तुम्ही शांत राहा, तुम्ही शांततेने घ्या. तुम्ही साधे साधे काम करा. अवघड कामे करायला मी आहे. मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. मी मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचे. आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले आहेत. मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यासाठी खंबीर आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती,असं त्यांनी सांगितले आहे.

नक्की वाचा: मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात  

मनोज जरांगेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए आहे. तो या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचे आहे आणि इथून सुरुवात झाली. पहिले त्यांच्याकडून खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचं ठरलं होतं.  मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले की याचा खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावर आले की, आपण गोळ्या किंवा औषध घेऊन मग घातपात करू.

अवश्य वाचा: खुंखार मुघल बादशाह औरंगजेबची भूमिका साकारणार विवेक ओबेरॉय 

‘मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील’ (Manoj Jarange Patil)

बीडचा कांचन पाटील नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचनाचे काम केले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले. तिथे एक मोठी बैठक सुरू होती, ती बैठक धनंजय मुंडे यांनी सोडली आणि यांच्याकडे गेले. त्यांची वारंवार धनंजय मुंडेंशी भेट व्हायची. कांचन पाटील आणि धनंजय मुंडे यांची २० मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.