Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Illegal Sand Transport : नगर : संगमनेर (Sangamaner) तालुक्यात अवैध वाळू वाहतूक (Illegal Sand Transport) करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून तब्बल तीन लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

संशयित आरोपी

अफरोज गुलाब पठाण (वय-२९,रा. एकतानगर, जोर्वे रोड, संगमनेर जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर जावेद शेख विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

तीन लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Illegal Sand Transport)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमारी कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार निंभाळे चौफुली ते जोर्वे गावाकडे जाणारे रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व पोलीस अंमलदार संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डिले यांच्या पथकाने केली.