Murder : पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Murder : पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

0
Murder : पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
Murder : पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Murder : नगर : दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण (Beating) करून खून (Murder) केल्या प्रकरणी आरोपी पती बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय ३८, रा. आंबी स्टोर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यास जिल्हा न्यायाधीश (District Judge) सी. एम. बागल यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा तसेच १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एका महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल एम. घोडके यांनी काम पाहिले.

या बाबत हकिकत अशी की,

बाबासाहेब हा त्याचे पत्नी शीतल, दोन मुली, मुलगा स्वप्निल यांच्यासह (रा. आंबी स्टोर, देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथे राहतात. बाबासाहेब यास दारू पिण्याचे व्यसन होते. पत्नी शितल ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होती. आरोपी यास दारूचे व्यसन असल्याने तो वारंवार पत्नीस दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत असे व पैसे दिले नाही तर तिला मारहाण करीत असे. १६ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री आरोपी याने पत्नीस दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी शितल हिने त्याला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत. या कारणावरून आरोपी याने लाकडी दांडक्याने तिच्यावर डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. या हल्ल्यात जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

राहुरी पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा (Murder)

ही घटना आरोपीचा मुलगा स्वप्निल याने प्रत्यक्ष पाहिली होती. मुलांनी आरडाओरड केल्याने शेजारचे लोक घटनास्थळी जमा झाले. लोक जमा झाल्याचे पाहताच आरोपी हा घरातून पळून गेला. त्यानंतर रात्री फिर्यादी विजय एकनाथ बर्डे (रा. सडे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) त्याचा भाऊ संजय याने घटनेबाबत माहिती दिली. फिर्यादी हा नातेवाईकांसह आरोपीच्या घरी आला असता. त्याने बहिण शितल हिचे प्रेत घरात अंथरूणावर पडलेले पाहिले. त्यावरून विजय बर्डे याने राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी करून आरोपी विरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदरच्या केसची चौकशी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एम. बागल यांचे समोर होऊन यात सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याची साक्ष महत्त्वाची ठरली. वरील साक्षी पुरावा ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता अनिल एम. घोडके यांनी जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. पैरवी अधिकारी मुख्तार कुरेशी व सीमा रजपुत, योगेश वाघ यांनी मोलाचे सहाकार्य केले.