
नगर : आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी (Loan waiver) मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची धक्कादायक विधान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे. विखे पाटलांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु असून या यादीत आता विखे पाटील यांची भर पडली आहे. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून सडकून टीकेचा प्रहार झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विधानावरून सारवासारव केली आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी!बीड नगरपरिषदेच्या छतावर आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह
विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता – बावनकुळे (Radhakrishna Vikhe Patil)

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करताना स्पष्ट केले की, विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता. त्यांनी सांगितले की, महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज १०० टक्के माफ करणार आहे आणि आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे. शेतकऱ्यांवर परत कर्ज होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
अवश्य वाचा: अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल;पुण्यातील जमीन प्रकरणावरुन विखे पाटलांचा टोला
अजित नवलेंचा राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्लाबोल (Radhakrishna Vikhe Patil)
अजित नवले म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांनाच दोषी ठरवण्याचं काम केलं आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे कर्ज सरकारी धोरणांचा परिणाम आहे. शेतकऱ्यांना लुटीची धोरणे राबवायची, आयात निर्यात धोरणे प्रभावित करायची आणि महागाईच्या नावाखाली भाव पाडायचे. विखेंप्रमाणेच मंत्रीमंडळातील अनेक सहकारी अशाच प्रकारचे वक्तव्ये करत आहेत. निवडणुकीपूर्वी यांनीच कर्जमाफीची आश्वासने द्यायची, मते घ्यायची आणि शेतकरी संघटनांनी तीच मागणी केल्यानंतर त्यांनाच नाव ठेवायचं, हे असच चालू राहिलं, तर याचा प्रतिकार करावा लागेल, असं ते म्हणालेत.


