Last Stop Khanda Movie Trailer:’लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा;चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0
Last Stop Khanda Movie Trailer:'लास्ट स्टॉप खांदा'तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा;चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Last Stop Khanda Movie Trailer:'लास्ट स्टॉप खांदा'तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा;चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

नगर : सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा’ (Last Stop Khanda Movie) या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे. उत्तम लेखन, अभिनय, संगीत असलेला, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Trailer launch) करण्यात आला आहे.

नक्की वाचा: “आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची”- राधाकृष्ण विखे पाटील   

चित्रपटात ‘हे’ कलाकार दिसणार (Last Stop Khanda Movie Trailer)

श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकरनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर, अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियंका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. संगीत श्रेयस राज आंगणे यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शन  राहुल बनसोडे, रवी आखाडे यांचे आहे.

अवश्य वाचा: मोठी बातमी!बीड नगरपरिषदेच्या छतावर आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह  

चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Last Stop Khanda Movie Trailer)

एका तरुणाचं त्याच्या लहानपणापासून एका मुलीवर प्रेम असतं, पण ते प्रेम यशस्वी झालेलं नसतं. मात्र, त्या मुलीचं तिच्या प्रियकराशी ब्रेकअप होताच, हा तरुण पुन्हा एकदा अनेक वर्षांनी तिच्या आयुष्यात आपलं स्थान शोधण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात तो यशस्वी होतो की नाही याची मनोरंजक गोष्ट “लास्ट स्टॉप खांदा” या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून हलकीफुलकी कथा, खुसखुशीत संवादाची फोडणी असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाविषयीची उत्कंठा निर्माण झाली आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.