LCB : नगर : राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपरची चोरी (Theft) करणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरातून (Pimpalgaon Malvi) ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
संशयित आरोपींची नावे
भगवान गोवर्धन कल्हापुरे (वय-३८,रा. खडांबे खुर्द ता.राहुरी), सोमनाथ नामदेव ठाणगे (वय-३१, रा. देहरे ता. अहिल्यानगर), अविनाश भिकन विधाते (वय- २९, रा. ताहाराबाद ता. राहुरी जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
डोंगरगण -पिंपळगाव माळवी परिसरातुन घेतले ताब्यात (LCB)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तहसील परिसरातून डंपरची चोरी भगवान गोवर्धन कल्हापुरे याने त्याच्या साथीदारांसह केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. व तो डंपर अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण -पिंपळगाव माळवी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घाटकर, फुरकान शेख, भिमराज खर्से, भगवान थोरात, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सुर्वणा गोडसे यांच्या पथकाने केली.



