AMRA : नगर : डोक्यावर स्वच्छतेचा संदेश पांढरी टोपी, हातात निळे ग्लोज घालून खराटा फावडे, घेत भारतमातेचा जयघोष करत परिसराची स्वच्छता… साथी हाथ बढाना… असे एकमेकांना सांगत स्वच्छतेस (Cleanliness) सुरवात… हे चित्र होते शनिवारी (ता. ८) सकाळचे. अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या (AMRA) पदाधिकाऱ्यांनी व शेकडो सदस्यांनी शहर डीप क्लीन स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आनंदधाम (Ananddham) ते आयुर्वेद महाविद्यालय पर्यंतचा रस्ता चकाचक केला.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
असोसिएशनचे सदस्य व मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित
जैनमुनी आलोकऋषी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी या स्वच्छता अभियान सुरुवात केली. यावेळी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अहिल्यानगर जिल्हा मोबाईल असोसिएशन अजित जगताप, महाराष्ट्र मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष गोरख पडोळे आदींसह माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक विपुल शेटिया, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, मोबाईल रिटेल असोसिएशनचे सदस्य संतोष बलदोटा, रितेश सोनिमंडलेचा, अमित बुरा, साजिद, हिरा शेठ, मनोज बलदोटा, प्रितम तोडकर, मनीष चोपडा, अतुल रचा, सुदाम वाडेकर, राकेश सोनिमंडलेचा यांच्यासह सर्व रिटेलर, सर्व मोबाईल अकॅसेसरिज विक्रेते, कंपनी पर्सन, प्रमोटरस, तसेच असोसिएशनचे शकडो सदस्य व मनपाचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

या डीप क्लीन स्वच्छता अभियानात आचार्य आनंदऋषी महाराजांच्या समाधी स्थळ, अहिंसा चौक, स्वस्तिक चौक, जुना टिळक रोड ते आयुर्वेद महाविद्यालय पर्यंत स्वच्छता करण्यात आली. यामध्ये मोबाईल रिटेल असोसिएशनचे सुमारे दोनशेच्या वर सदस्य उत्स्फूर्तपणे या स्वच्छता अभियान मध्ये सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांनी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छता करत रस्ते चकाचक केले. रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेले झाडेझुडपे, वेल काढून मोठमोठे दगड माती उचलण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः हातात झाडू घेऊन आनंदधाम परिसराची स्वच्छता केली. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना विविध सूचना देत स्वच्छता करून घेतली. जुन्या टिळक रोड वरील रस्ता दुभाजकावर मोठ्याप्रमाणात उगवलेले गवत साफ करण्यात आले.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
आमदार संग्राम जगताप म्हणाले, (AMRA)
नगर शहरात सुरु झालेल्या डीप क्लीन स्वच्छता अभियानामुळे शहराचे रूप बदलत असून सर्वत्र अस्वच्छतेचे चित्र आता बदलत आहे. महापालिकेच्या सहकार्याने यामध्ये मोठ्याप्रमाणात सहभाग झाला आहे. तसेच मोबाईल रिटेल असोसिएशन सारख्या अनेक सामाजिक संघटनाही यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आपल्या शहराप्रती प्रेम करत हे मंडळी या अभियानात सहभागी होत आहेत. इंदोरच्या धर्तीवर हे अभियान राबवून भविष्यात इंदोरच्या पुढे आपले नगर पुढे न्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, गेल्या आठ दिवसापासून शहरात हे विशेष स्वच्छता अभियान राबवले जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या या अभियानामुळे शहराने एक पाऊल स्वच्छतेकडे टाकले आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक अद्यापही रस्त्यावर कचरा टाकत आहेत, अशा नागरिकांचा आम्ही शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत. आत्तापर्यंत सुपारे ४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आपला कचरा घंटा गाडीतच टाका, इतरत्र रस्त्यावर टाकू नका, अये आवाहन त्यांनी केले.अजित जगताप म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत इंदोरच्या धर्तीवर आपले नगर शहर स्वच्छ करत आहे. त्यांच्या या चांगल्या कामात अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशन सहभागी होत आहे. असोसिएशनचे २०० हून अधिक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. नागरिकांनी यामध्ये सहभगी होत आपले घर, परिसर, कॉलनी स्वच्छ ठेवल्यास आपले शहर एका दिवसात स्वच्छ होईल, असे त्यांनी सांगितले.




