IND vs AUS:भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन नमवलं,मालिका २-१ ने जिंकली

0
IND vs AUS:भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन नमवलं,मालिका २-१ ने जिंकली
IND vs AUS:भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात जाऊन नमवलं,मालिका २-१ ने जिंकली

IND vs AUS: मायदेशात असो किंवा विदेशात टीम इंडिया (Team India) ही क्रिकेटमध्ये ‘किंग’ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. क्रिकेट विश्वावर वर्चस्व असलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं (IND vs AUS) त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केलं आहे. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द (Final match cancelled due to rain) झाला आहे. मात्र तरीही भारताने ही मालिका २-१ ने जिंकली.

नक्की वाचा:  शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा यू-टर्न  

सामन्यात नेमकं काय घडलं ? (IND vs AUS)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक आणि अंतिम सामना आज, शनिवारी ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर सुरू होता. भारताची प्रथम फलंदाजी होती. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरूवात केली. मात्र पावसामुळं हा सामना थांबवावा लागला. बराच वेळ पाऊस सुरूच असल्यानं अखेर हा सामना रद्द करावा लागला. पावसामुळं या मालिकेतील दोन सामने रद्द करावे लागले आहेत. भारतानं यासह पाच सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय टी २० मालिका विजयाची घोडदौड भारतानं सुरूच ठेवली आहे.

अवश्य वाचा: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा;चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

अभिषेकने शर्माने रचला इतिहास  (IND vs AUS)

ब्रिस्बेनला होणारा पाचवा सामना निर्धारित वेळेत सुरू झाला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र ४.५ षटकानंतर खराब वातावरणामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यावेळी भारताने बिनबाद ५२ धावा केल्या होत्या. उपकर्णधार शुभमन गिल १६ चेंडूत २९ धावांवर नाबाद होता, तर अभिषेक शर्मा १३ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या होत्या. यादरम्यान, अभिषेकने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावाही पूर्ण केल्या होत्या. भारतासाठी ही पुढच्यावर्षी मायदेशात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी परदेशात झालेली अखेरची टी-२० मालिका होती.