Nilesh Lanke : अहिल्यानगर बायपास व नगर–मनमाड मार्गासाठी ४.६८ कोटींचा निधी : खासदार लंके 

Nilesh Lanke : अहिल्यानगर बायपास व नगर–मनमाड मार्गासाठी ४.६८ कोटींचा निधी : खासदार लंके 

0
Nilesh Lanke : अहिल्यानगर बायपास व नगर–मनमाड मार्गासाठी ४.६८ कोटींचा निधी : खासदार लंके 
Nilesh Lanke : अहिल्यानगर बायपास व नगर–मनमाड मार्गासाठी ४.६८ कोटींचा निधी : खासदार लंके 

Nilesh Lanke : नगर : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील (Ahilyanagar Lok Sabha Constituency) राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अहिल्यानगर बायपासवरील पूरप्रवण भागातील सुधारणा, पूरनियंत्रण तसेच सुविधा विकासासाठी तब्बल ४.६८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिली.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

खासदार लंके यांनी सांगितले की,

“ही मंजुरी केवळ निधीपुरती मर्यादित नाही, तर गेल्या अनेक महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे. दिल्लीतील मंत्रालयीन चर्चेनंतर अखेर ही कामे मंजूर झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाकडून  शुक्रवारी (ता.७) रोजी आदेशानुसार पुढील प्रमुख कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सारोळाबद्दी येथे सर्व्हिस रोड व आरसीसी गटार बांधकाम,  नारायणडोह, नेप्ती (कल्याण जंक्शन) व पुणे जंक्शन परिसरात आरसीसी गटार कामे, आरणगाव येथे पथदिव्यांची  उभारणी, मांडळी–नागमठाण व देहेरे येथील बोगद्यांचे बांधकाम व दुरुस्ती यांचा समावेश आहे.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य (Nilesh Lanke)

ही सर्व कामे पुढील १५ ते ३० दिवसांत सुरू होणार असून, संबंधित कंत्राटदार व प्रकल्प संचालक कार्यालयाला यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. नगर–मनमाड या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील कामांना गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प मिश्र वार्षिक पद्धत या तत्त्वावर राबविला जात आहे. एप्रिल २०२७ पर्यंत पूर्णत्वाचा करार असला तरी डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. “या महामार्गाच्या कामासाठी मी स्वतः ११ जुलै २०२५ रोजी बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर केंद्र सरकार व एनएचएआय प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली,” असे खासदार लंके यांनी सांगितले.