
नगर : लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ऑस्ट्रेलियाने (Australia) मोठा निर्णय घेतला आहे. १६ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या (Children under 16 years of age) सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे निर्बंध (Complete ban on social media use) घालण्यात आले आहे. पंतप्रधान अँथनी अल्बनीज (PM Anthony Albanese) यांनी स्पष्टपणे म्हटलं की, मानसिक आरोग्य आणि त्यांचा विकास सुरक्षित राहण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. हा कायदा डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेला मुलगा किंवा मुलगी अकाऊंट उघडू शकत नाही किंवा जुनं अकाऊंट सुरु ठेवू शकणार नाही.
नक्की वाचा: कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची एन्ट्री!
ऑस्ट्रेलियाकडून लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई (Australia Social Media Ban)

ऑस्ट्रेलिया सरकारनं ऑनलाईन सुरक्षा दुरुस्ती विधेयक २०२४ ला सादर केलं आहे. त्यानुसार देशातील १६ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यानं सोशल मीडिया वापरणे बेकायदेशीर असेल. याचाच अर्थ सोशल मीडियावर खातं उघडण्यासाठी ऑस्ट्रेलियात किमान वय १६ वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. १६ वर्षांपेक्षा कमी वय असून देखील जे सोशल मीडिया वापरतात त्यांची अकाऊंट बंद होतील. मुलांना इंटरनेटवरील वाढत्या संकटांपासून वाचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा: गोलीगत सूरज चव्हाण चढणार बोहल्यावर;कोण आहे होणारी बायको ?
कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी?(Australia Social Media Ban)
ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयानुसार, हा नियम सर्व मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू असेल. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब, रेडिट आणि किक यावर देखील हा निर्णय लागू असेल. ऑस्ट्रेलियातील कोणताही १६ वर्ष पूर्ण नसलेला मुलगा किंवा मुलगी खातं उघडू शकणार नाही. १६ वर्ष पूर्ण नसलेल्यांची खाती बंद करावी लागतील. याशिवाय वयाची पडताळणी करण्यासाठी नवी यंत्रणा सुरु केली जाणार आहे.


