Yashwant Dange : नगर : महापालिकेच्या (AMC) प्रारूप मतदार यादीचे (Voter List) काम महापालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फतच सुरू आहे. विधानसभा मतदार संघाच्या यादीची मूळ पीडीएफ कॉपी महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याची प्रिंट खासगी झेरॉक्स सेंटरवरून काढण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्याला अथवा बाहेरील व्यक्तीला यादीचे काम देण्यात आलेले नाही. नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती, अफवा पसरवू नये, कोणतीही माहिती खात्री किंवा पडताळणी केल्याशिवाय प्रसिद्ध करू नये, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे. तसेच, मतदार यादी संदर्भात चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय मतदार याद्या
अहिल्यानगर शहरातील समाजमाध्यमावर मतदार यादीचे काम एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दिल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केली जात आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. महापालिकेला विधानसभेची १ जुलैची मूळ मतदार यादीची सॉफ्ट कॉपी प्राप्त झाली होती. ती खासगी झेरॉक्स सेंटरवरून प्रिंट काढून घेतलेली आहे. महापालिका कर्मचारी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे काम करत आहेत. त्यानुसार कंट्रोल चार्ट भरल्यानंतर निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअरमधून प्रारूप याद्या तयार होणार आहेत.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये (Yashwant Dange)
त्या प्रारूप याद्या १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत विधानसभेची मूळ मतदार यादीची प्रिंट काढण्याव्यतिरिक्त खासगी व्यक्तींकडून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत काम सुरू असल्याचे वृत्त चुकीचे आहे. माध्यमांनी निवडणुकीशी संबंधित वृत्त प्रसिद्ध करताना अधिकृत माहिती घेऊन, माहितीची पडताळणी करून प्रसिद्ध करावे. नागरिकांनी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.



