Radhakrishna Vikhe Patil : त्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या; विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe Patil : त्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या; विखे पाटलांची टीका

0

Radhakrishna Vikhe Patil : पारनेर : जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणत्या राजांनी केल्या. कुकडी कालव्याच्या (Kukadi Canal) कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही. जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी (Politics) आले निधीसाठी मात्र मागे हटले, अशी घणाघाती टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली. तालुक्यातील ४९ गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

पहिल्या टप्प्यातील कामासाठी ८२ कोटींचा निधी उपलब्ध

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. महायुती सरकारने एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील १ ते ६० किलोमीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे. वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार काशिनाथ दाते, शरद सोनवणे, ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते, डाॅ.सुजय विखे पाटील, मुख्य अभियंता संजीलनव चोपडे, अधीक्षक अभियंता अलका अहीरराव, राहूल शिंदे, विश्वनाथ कोरडे, विजयराव औटी, सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil : त्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या; विखे पाटलांची टीका
Radhakrishna Vikhe Patil : त्यांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या; विखे पाटलांची टीका

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

मंत्री विखे म्हणाले की, (Radhakrishna Vikhe Patil)

१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही. अनेकांनी इथे फक्त भाषण केली. कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे. १८०० क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४०० क्युसेसवर आला. शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेल तर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणाऱ्या गावांना काम करून न्याय द्यायचा ही भूमिका महायुती सरकारची आहे.
आमदार काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली. ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे. आमदार शरद सोनवणे म्हणाले, कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही, या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रिया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.