LCB : नगर : संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल (Slaughter of Cows) करून गोमांस विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छापा टाकून १२ लाख १४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
संशयित आरोपीचे नावे
साहिल मुस्ताफ कुरेशी (वय – २२, रा. गल्ली नं.०९, जमजम कॉलनी संगमनेर अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीसार तरबेज (पूर्ण नाव माहीत नाही रा.अलकानगर संगमनेर), आलासहाब (पूर्ण नाव माहीत नाही) रा. अलकानगर संगमनेर (दोघे पसार), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
१२ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (LCB)
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून १२ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाख १४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डिले, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



