BJP : शहर भाजपने दिल्ली येथील घटनेचा केला निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा 

BJP : शहर भाजपने दिल्ली येथील घटनेचा केला निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा 

0
BJP : शहर भाजपने दिल्ली येथील घटनेचा केला निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा 
BJP : शहर भाजपने दिल्ली येथील घटनेचा केला निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा 

BJP : नगर : दिल्लीत दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड बॉम्बस्फोट घटनेचा (Delhi Red Fort Car Blast) शहर भाजपच्या (BJP) वतीने मंगळवारी (ता. ११) दिल्लीगेट येथे निषेध करत पाकिस्तान (Pakistan) मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ, सावेडी मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

यावेळी अनिल मोहिते म्हणाले,

जैश ये मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केलेल्या या बॉम्बस्फोट घटनेचा शहर भाजप जाहीर निषेध करत आहे. पाकिस्तानच्या या कुरापती म्हणजे देशाविरुद्ध युद्धच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या सैन्याने वेळोवेळी पाकिस्तानला सडेतोड उत्तराने बदला घेत अद्दल घडवली आहे. या हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूर प्रमाणे नक्कीच बदला घेतला जाईल. पाकिस्तानी’ आतंकवाद्यांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे. जर या पुढील काळात भारतावर असे दहशतवादी हल्ले झाले तर भारत नक्कीच पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

रुद्रेश अंबाडे म्हणाले, (BJP)

पाकिस्तानी जिहादी वृत्तीच्या दहशतवाद्यांनी कट रचून भारताच्या राजधानीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानी उच्चशिक्षित डॉक्टर दहशतवादी आहेत. असे हजारो उच्चशिक्षित अतिरेकी देशात लपून बसले आहेत. बनावट आधार कार्ड द्वारे ते देशात वावरत आहेत. अशा उच्चशिक्षित दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. यावेळी राहुल जामगावकर, अनिल गट्टानी, अभिजीत गायकवाड, अजय चितळे, सचिन पळशीकर, संगीता खरमाळे, दीपक देहेरेकर, आयुष पाथरकर, देवेंद्र बंब, शुभम देहेरेकर, आकाश सोनवणे, सुजित खरमाळे, अभिषेक वाकळे, चिन्मय पंडित, राजू मंगलारप, लक्ष्मण तिवारी, अजिंक्य गुरावे व बाळासाहेब भुजबळ आदि उपस्थित होते.