Radar-Equipped Interceptor Vehicles : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चपराक; ‘इंटरसेप्टर’ यंत्रणा युक्त वाहन अहिल्यानगर पोलीस दलात दाखल

Radar-Equipped Interceptor Vehicles : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चपराक; 'इंटरसेप्टर' यंत्रणा युक्त वाहन अहिल्यानगर पोलीस दलात दाखल

0
Radar-Equipped Interceptor Vehicles : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चपराक; 'इंटरसेप्टर' यंत्रणा युक्त वाहन अहिल्यानगर पोलीस दलात दाखल
Radar-Equipped Interceptor Vehicles : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चपराक; 'इंटरसेप्टर' यंत्रणा युक्त वाहन अहिल्यानगर पोलीस दलात दाखल

Radar-Equipped Interceptor Vehicles : नगर : वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Violation) करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी आता ‘इंटरसेप्टर’ यंत्रणायुक्त वाहन (Radar-Equipped Interceptor Vehicles) अहिल्यानगर पोलीस दलात (Ahilyanagar Police Force) दाखल झाले आहे. त्यामुळे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर या अत्याधुनिक वाहनातील यंत्रणेच्या आधारे कारवाई केली जाणार आहे.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे हस्ते अनावरण

दरम्यान, इंटरसेप्टर वाहनाचे मंगळवारी (ता. ११) रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, मोटार परिवहन पोलीस निरीक्षक प्रेमदिप माने, स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार कबाडी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई (Radar-Equipped Interceptor Vehicles)

सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशानुसार महामार्ग पोलीस विभाग व जिल्हा पोलीस घटकाकरीता वाटप करण्यात आलेल्या इंटरसेप्टर वहनामध्ये चार डी रडार, स्पीडगन ब्रेथ ॲनालाझर, टिंट मीटर, पी. जे. सिस्टम, प्रथमोचार किट, फायर एक्सेंजर अशी साधनसामुग्री आहे. इंटरसेप्टर वाहनांव्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्याकरीता प्रशिक्षित एक अधिकारी व दोन अंमलदारांची नेमणूक असणार आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकरीता विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये इंटरसेप्टर वाहन मिळाले आहे.