Google Doodle : काही शोधायचे असेल तर आपण सगळ्यात आधी गुगलवर (Google) जातो. मात्र आज सकाळी जेव्हा तुम्ही गुगलचं होमपेज ओपन केलं असेल तेव्हा तुम्हाला थोडे वेगळे वाटले असेल. कारण आज गुगल रंगापासून ते लोगोपर्यंत वेगळ्या पद्धतीने चमकत असल्याचे दिसून येते. गुगलने आज अॅनिमेटेड डूडल (Google Animated Doodle) बनवले आहे. हे डूडल “चतुर्भुज समीकरण”(Quadratic Equation) दर्शवते. या डुडलमध्ये गुगलने गणिताच्या एका मूलभूत संकल्पनेचा सन्मान केला आहे. चला सविस्तर जाणून घेऊयात…
नक्की वाचा: मुंबईत १५ कोटीच्या सोन्याची तस्करी;DRI च्या ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मोठी कारवाई
आज गुगल डूडलमध्ये नेमकं काय? (Google Doodle)
आजच्या डूडलमध्ये गुगल हा शब्द गणिताचे सूत्र आणि समीकरणांनी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. गुगल या शब्दाच्या मध्यभागी प्रसिद्ध गणित समीकरण ax² + bx + c = 0 दिसत आहे. या समीकरणाभोवती, गुगलने असे अॅनिमेटेड घटक जोडले आहेत जे गणित सुंदरपणे सादर करत आहेत. आलेख, संख्या आणि चलांचा पॅराबोला जो समीकरण सोडवण्याची प्रक्रिया दाखवतो. तसेच, खेळांमध्ये गती स्पष्ट करण्यासाठी पुस्तकांमध्ये समीकरणे वापरली जातात, त्याचप्रमाणे गुगलने आपल्या डूडलमध्ये अशीच कला दाखवली आहे. डुडल बनवणाऱ्यांनी “गुगल” शब्दाचे तिसरे अक्षर O हे बास्केटबॉलसारखे दाखवले आहे, ज्याला चौथे अक्षर g आणि शेवटचे अक्षर e ने किक मारली जात आहे.
अवश्य वाचा: ..तर अजित पवार राजीनामा देतील – माणिकराव कोकाटे
आजच हे डूडल का दिसत आहे? (Google Doodle)
गुगलने हे डूडल शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सादर केले आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरवातीला, जगभरातील अनेक शिक्षण प्रणाली त्यांच्या अभ्यासक्रमात चतुर्भुज समीकरणांचा समावेश करतात. या विशेष गणित-थीम असलेल्या डूडलद्वारे, गुगल विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगत आहे की, गणित हे परस्परसंवादी आणि मजेदार असू शकते. गणित ही भीती बाळगण्याची गोष्ट नाही, तर ती समजून घेण्याची कला आहे, हेच दाखवण्यात आले आहे.



