
Birsa Munda : नगर : भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda) यांनी आपल्या अल्प जीवन कार्यात देशातील जनजाती समाज एकवटून त्यांचे नेतृत्व करत आदर्शवत काम केले. आदिवासींचे (Tribals) धर्मांतर थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अशा महान भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होतो. हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय जनजाती कल्याण आश्रमाचे केंद्रीय प्रतिनिधी सुरेश कुलकर्णी यांनी केले.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
पदाधिकारी व जनजाती समाजातील नागरिक उपस्थित
अहिल्यानगर जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रे प्रसंगी सुरेश कुलकर्णी बोलत होते. अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून भारतमातेच्या व भगवान बिरसा मुंडा यांच्या जयजयकारात या रथयात्रेचा प्रारंभ झाला. यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या रथात भारतमाता, भगवान बिरसा मुंडा व तंट्या भिल्ल यांच्या प्रतिमा असून रथावर बिरसा मुंडा यांची ‘बीरसायत’ ची सूत्रे व कार्याची माहिती लावण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जिल्हा कार्यवाह हिराकांत रामदासी, जनजाती कल्याण आश्रमचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अरविंद पारगावकर, सचिव अनंत पुंड यांच्यासह पदाधिकारी व जनजाती समाजातील नागरिक उपस्थित होते.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
अरविंद पारगावकर म्हणाले, (Birsa Munda)
भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत जनजाती समजातील नागरिकांमध्ये प्रबोधन व जनजागृती करून त्यांना संघटिक करण्यासाठी जनजाती कल्याण अश्रम काम करत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली ही रथयात्रा प्रेरणादायी आहे. सोमनाथ पवार म्हणाले, अहिल्यानगर जनजाती कल्याण आश्रमाची रथयात्रा नगर जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या वस्त्यांमध्ये विविध भागांमध्ये ३ दिवस प्रवास करून जनजागृती करणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी मुळाधरण येथे या रथयात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी अहिल्यानगर जनजाती कल्याण आश्रमाचे कोषाध्यक्ष अनिल लवांडे, सह कोषाध्यक्ष मिलंद मुळे, महिला आघाडी प्रमुख डॉ.मैत्रेयी लिमये, श्रीकांत आपटे, हारजीत माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपर्क प्रमुख विशारद पेटकर यांनी केले. प्रांत आरोग्य प्रमुख डॉ.निळकंठ ठाकरे यांनी आभार मानले.


