
नगर : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणीसाठी (Shivsena NCP Symbol Dispute) तारीख पे तारीखची मोहीम सुरु आहे. आता या सुनावणीसाठी पुन्हा नवीन तारीख मिळाली आहे. या दोन्ही पक्षांच्या वादावर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) पुढच्या वर्षी म्हणजेच २१ जानेवारी रोजी या प्रकरणी सुनावणी करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Elections) जवळपास पार पडल्यानंतरच याचा फैसला होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा: गुगललाही पडली गणिताची भुरळ;गणितातील समीकरणे वापरून बनवले डुडल
उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव (Shivsena and NCP Symbol Dispute)

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
अवश्य वाचा: मुंबईत १५ कोटीच्या सोन्याची तस्करी;DRI च्या ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मोठी कारवाई
युक्तिवादासाठी दोन तास दिले जाणार (Shivsena and NCP Symbol Dispute)
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासाठीची सुनावणी आज १२ नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर आता २१ जानेवारी ही पुढची तारीख देण्यात आली आहे. त्या दिवशी पहिल्यांदा शिवसेना प्रकरणात युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रकरणही ऐकले जाईल. त्यासाठीही दोन्ही गटांना दोन तासांचा वेळ देण्यात येणार आहे. ही सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११. ३० वाजता होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी लागेल असं वाटत असतानाच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता पुढच्या तारखेमुळे त्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.


