
नगर : निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा (Local government elections) करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर (BJP’s Star Campaigners Announced) करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा यादीत समावेश आहे.
नक्की वाचा: शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता २०२६ ला होणार
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण ? (BJP’s Star Campaigners)

भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुलरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.
अवश्य वाचा: मुंबईत १५ कोटीच्या सोन्याची तस्करी;DRI च्या ‘ऑपरेशन बुलियन ब्लेझ’ अंतर्गत मोठी कारवाई
मतदारांचा कौल नेमका कोणाला ?(BJP’s Star Campaigners)
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात काही ठिकाणी भाजप ही निवडणूक महायुतीमध्ये लढणार आहे, तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढणार आहे. सध्याचं राजकीय वातावरण पाहता सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कारण यानंतर आता लगेच महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


