Stray Dogs : भटके कुत्रे व मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करा; समाजवादी पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना दिले स्मरणपत्र

Stray Dogs

0
Stray Dogs : भटके कुत्रे व मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करा; समाजवादी पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना दिले स्मरणपत्र
Stray Dogs : भटके कुत्रे व मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करा; समाजवादी पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना दिले स्मरणपत्र

Stray Dogs : नगर : शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांचा (Stray Dogs) व मोकाट जनावरांच्या त्रासामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) वतीने महापालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) स्मरणपत्र देण्यात आले. हा प्रश्‍न तातडीने न सोडविल्यास १७ नोव्हेंबरला महापालिकेसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

आश्‍वासनाला उलटून गेले तीन महिने

समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. शहरात भटके कुत्रे व मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी व वृद्ध यांना नेहमीच धोका निर्माण होत आहे. या समस्येवर उपाययोजना व्हावी म्हणून १३ ऑगस्ट रोजी समाजवादी पक्षाने उपायुक्तांना निवेदन दिले होते. त्यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी महापालिकेतर्फे नेमलेल्या ठेकेदारामार्फत दररोज कुत्रे व मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे आंदोलन करू नका. मात्र, या आश्‍वासनाला आता तीन महिने उलटून गेले असले तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

महापालिकेसमोर रास्ता रोको करण्याचा इशारा (Stray Dogs)

शहरातील गल्लीबोळ, चौक, बाजारपेठा आणि शाळांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर कायम आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनाही घडल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आठ दिवसांच्या आत भटके कुत्रे पकडून त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेवावे, त्यांची नसबंदी करून पुन्हा शहरात सोडू नये. यासंदर्भात आयुक्तांनी खुलासा करावा. अन्यथा १७ नोव्हेंबरला महापालिका समोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.