Saibaba : राहाता : श्री साईबाबा (Saibaba) व श्री साईबाबा संस्थान (Shree Saibaba Sansthan Shirdi) विषयी विविध समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम यांनी आज राहाता न्यायालयात (Rahata Court) हजर राहून आपली चूक मान्य केली आहे.
अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा
त्यांनी न्यायालयासमोर नमूद केले की,
“श्री साईबाबा व श्री साईबाबा संस्थानबाबत असलेले गैरसमज माझे दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही.” २०२३ मध्ये श्री साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर, श्री साईबाबा संस्थानने अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राहाता येथील न्यायालयात कायदेशीर दावा दाखल केला होता, ज्यामध्ये अजय गौतम यांचा समावेश होता.
दरम्यानच्या काळात त्यांचे गैरसमज दूर झाल्याने, आज त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की त्यांच्या पूर्वीच्या विधानांचा आधार हा अपुऱ्या माहितीतून झालेल्या गैरसमजांवर होता. त्यानंतर त्यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठी उपस्थित राहून दर्शन घेतले. दर्शनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजय गौतम यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत सांगितले की, “मी आता बाबांच्या प्रचार–प्रसारासाठी लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल
सकारात्मक भूमिकेबद्दल त्यांचे स्वागत (Saibaba)
या सकारात्मक भूमिकेबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “ज्यांचे अजूनही काही गैरसमज असतील त्यांनी थेट श्री साईबाबा संस्थानशी संपर्क साधावा; अन्यथा बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरूच राहील.” या संपूर्ण प्रक्रियेत संस्थानचे माजी विश्वस्त मोहन जयकर यांनी महत्त्वपूर्ण समन्वय साधला.



