Bhingar Camp Police Station : रस्त्यावर हातगाड्या उभा करणाऱ्यांवर कारवाई; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा

Bhingar Camp Police Station : रस्त्यावर हातगाड्या उभा करणाऱ्यांवर कारवाई; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा

0

Bhingar Camp Police Station : नगर : अहिल्यानगर सोलापूर महामार्गावरील (Ahilyanagar Solapur Highway) चांदणी चौक परिसरात रस्त्यामध्ये हातगाड्या उभ्या करून सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) दोन स्वतंत्र गुन्हे दाखल (Crime Filed) करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आले गुन्हे

हंसराज पोखर जाट (वय २५, रा. हनुमान मंदिराजवळ, नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) याने त्याच्या ताब्यातील आईसक्रीम विक्रीची हातगाडी रस्त्यामध्ये उभी करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना अडथळा निर्माण केला. दुसऱ्या घटनेत, दिगंबर लक्ष्मण शिंदे (वय ५१, रा. गवळीमळा, निंबोडी, ता. अहिल्यानगर) याने गॉगल व चष्मा विक्रीची हातगाडी रस्त्यामध्ये उभी करून वाहतूक अडवली. याप्रकरणी दोघा विक्रेत्यांवर पोलिसांनी फिर्यादी दाखल केल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

कडक कारवाई करण्यात येणार (Bhingar Camp Police Station)

सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. सार्वजनिक रस्त्यांवर हातगाड्या, स्टॉल अथवा वाहन उभे करून अडथळा निर्माण करणे हे गुन्हा मानले जाईल आणि अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.