Congress : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले  

Congress : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले  

0
Congress : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले  
Congress : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले  

Congress : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) २०२५ च्या नगरसेवक (Corporators) पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. महापालिकेने आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसते. त्यानुसार राजकीय पक्षांनी (Political Party) आपल्या इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिली आहे.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

२० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने व पक्षाचे ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २० नोव्हेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन दीप चव्हाण यांनी केले आहे.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

प्रदेशाध्यक्षांच्या मान्यतेने पुढची प्रक्रिया पार पडणार (Congress)

शुल्का सहित अर्ज भरताना उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून त्यात उमेदवारांची सर्व माहिती त्याचा बायोडाटा, त्याने आतापर्यंत केलेले काम, सामाजिक राजकीय स्वरूपात तसेच संबंधित उमेदवारावर दाखल असलेले न्यायालयीन प्रक्रियेतील कलमांतर्गत तपशील यात मागवण्यात आले आहेत. उमेदवाराने सर्व अर्ज विहित नमुन्यात भरून द्यायचा आहे. तो अर्ज कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांची यादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने पुढची प्रक्रिया पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.