Bhingar Camp Police Station : जुगारावर अड्ड्यावर छापा; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhingar Camp Police Station : जुगारावर अड्ड्यावर छापा; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Bhingar Camp Police Station : जुगारावर अड्ड्यावर छापा; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bhingar Camp Police Station : जुगारावर अड्ड्यावर छापा; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhingar Camp Police Station : नगर : भिंगार परिसरात कल्याण मटका नावाने सुरू असलेल्या जुगार (Gambling) अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police Station) छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी (Police) रोकड व जुगार साहित्य असा मिळून एक हजार ५० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई अहिल्यानगर -पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या विजय लाईन चौकात, पत्राच्या शेडमध्ये सुरु असलेल्या टपरीवर करण्यात आली.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती (Bhingar Camp Police Station)

रवींद्र राजू धोत्रे (वय २९, रा. यशवंत नगर, डेअरी फार्म, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना लोकांकडून पैसे घेऊन हारजितीचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अंमलदार प्रमोद लहारे, बापूसाहेब म्हस्के यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.