Rahata Municipal Council : राहाता नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

Rahata Municipal Council : राहाता नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

0
Rahata Municipal Council : राहाता नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल
Rahata Municipal Council : राहाता नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल

Rahata Municipal Council : राहाता : राहाता नगरपरिषदेच्या (Rahata Municipal Council) निवडणुकीची रणधुमाळी आज (ता. १२) तिसऱ्या दिवशी दोन नगराध्यक्ष पदासाठी (Mayor Post) अर्ज दाखल झाल्याने खऱ्या अर्थाने सुरू झाली. आज नगराध्यक्ष पदासाठी तुषार गणेश सदाफळ व भानुदास बकाजी गाडेकर ही दोन अर्ज दाखल झाल्याची माहिती राहत्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी (Election Decision Officer) मनीषा राशिनकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी दिली.

अवश्य वाचा : ‘ती’ कार आमची नाहीच;दिल्लीतील स्फोटानंतर पुलवामातील अमीर,उमरच्या कुटुंबियांचा दावा

उमेदवार निवडीसाठी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिल्डिंग

राहता नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीसाठी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिल्डिंग लावण्याचे काम वेगाने चालू आहे मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार भेटी घेऊन अंदाज बांधत आहेत तर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटी घेऊन आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दर्शवित आहेत. या निवडणुकीत सध्या तरी महायुती महाविकास आघाडी या खेरीज तिसरी आघाडी व अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल होतील.

नक्की वाचा : राजूर येथे गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोणा; सहा जणांवर गुन्हा दाखल

महायुतीचा उमेदवार चर्चेनंतर निश्चित हाेणार (Rahata Municipal Council)

महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यातील चर्चेनंतर महायुतीचा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार निश्चित होईल. तर महाविकास आघाडी कडून नगराध्यक्ष पदासाठी धनंजय गाडेकर यांच्या नावाची निश्चिती झाल्याचे समजते. नगरसेवक पदासाठी अद्याप कोणाचेही नाव पुढे नाही. इच्छुकांची मात्र दोन्ही बाजूने मोठी गर्दी दिसत आहे. यामध्ये तिसरी आघाडी कोण उभी करणार याबाबतही नागरिकात चर्चा सुरू आहे. 


डॉ राजेंद्र पिपाडा यांची या निवडणुकीत काय भूमिका राहील याकडेही मतदारांचे लक्ष आहे. महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. स्वाधीन गाडेकर तसेच माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, स्वप्निल गाडेकर आदी नावांची चर्चा आहे. १५ व १६ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे.  राहाता नगरपालिकेचे निवडणुकीसाठी १० प्रभागातून २० नगरसेवक निवडून दिले जाणार असून मतदारांची संख्या एकूण १९ हजार ४६४ आहे.