Election : निवडणुकीसाठी खर्चाचे दर जाहीर; व्हेज थाळी १८०, नॉनव्हेज थाळी २४० रुपये

Election : निवडणुकीसाठी खर्चाचे दर जाहीर; व्हेज थाळी १८०, नॉनव्हेज थाळी २४० रुपये

0
Election : निवडणुकीसाठी खर्चाचे दर जाहीर; व्हेज थाळी १८०, नॉनव्हेज थाळी २४० रुपये
Election : निवडणुकीसाठी खर्चाचे दर जाहीर; व्हेज थाळी १८०, नॉनव्हेज थाळी २४० रुपये

Election : नगर : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (Election) उमेदवारांना प्रचारादरम्यान होणारा खर्च (Election Expenses) नोंदविणे बंधनकारक आहे. या खर्चासाठी खाद्यपदार्थ, जाहिराती, रॅली, वाहन, मंडप, हार, फेटे, सुरक्षा अंगरक्षक आदींसाठीचे दर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी निश्चित केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार हे दर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या उपस्थितीत ठरविण्यात आले. यामध्ये व्हेज थाळी स्पेशल -१८०, नॉनव्हेज थाळी -२४०, बिर्याणी १५० रुपये ठरविण्यात आले आहे.

अवश्य वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा

या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपालिका तसेच नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवार (ता. १०) पासून सुरूवात झाली आहे. अर्ज दाखल केल्यापासून मतदान होईपर्यंतचा सर्व खर्च उमेदवाराला दैनंदिन नोंदणीसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल. उमेदवाराने राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडणे बंधनकारक आहे. अर्ज दाखल केल्यानंतर खर्च नोंद करावी लागणार आहे. सभा, रॅली, वाहन, जाहिरात, पोस्टर, कार्यकर्त्यांसाठी चहापान व भोजनाचा खर्च नमूद करणे आवश्यक आहे.

नक्की वाचा : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले

खाद्यपदार्थांच्या खर्चाचे रेट कार्ड (दर रूपयामध्ये) (Election)

चहा- १०, कॉफी -१५, पोहे -२०, वडापाव -१५, भजे प्लेट -२०, पाण्याची बाटली -१७, मिसळपाव -६०, पावभाजी -६०, व्हेज थाळी स्पेशल -१८०, नॉनव्हेज थाळी -२४०, बिर्याणी -१५०.

तर इतर खर्चाचे दर रूपयामध्ये – फुलांचा लहान हार -३०, फुलांचा मोठा हार -८०, गांधी टोपी -१०, फेटा -१९०, ढोल-ताशा प्रति व्यक्ती -५००, मंडप स्क्वेअर फूट -१५, प्लॅस्टिक खुर्ची दिवसाचे भाडे -१०, व्हीआयपी सोफा – १ हजार ५००, पिण्याच्या पाण्याचा टँकर -२ हजार २००, माहितीपत्रक एफोर साईज एक हजार प्रती ४ हजार २५० असणारा आहे.