Madha News:अभिमानास्पद! माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी झाले उपजिल्हाधिकारी

0
Madha News:अभिमानास्पद! माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी झाले उपजिल्हाधिकारी
Madha News:अभिमानास्पद! माढ्याचे चार सुपुत्र एकाचवेळी झाले उपजिल्हाधिकारी

नगर : माढा तालुक्याची (Madha News) मान अभिमानाने उंचावली आहे. माढा तालुक्यातील चार तहसीलदार (Four Tehsildar)एकाच वेळी उपजिल्हाधिकारी (Deputy Collectors)बनले आहेत. माढा तालुक्यातील तरुणांनी गेल्या दोन दशकापासून स्पर्धा परीक्षेत आपले नशीब आजमावले आहे. आज तालुक्यातील अनेक तरुण केंद्रीय आणि राज्य स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन मोठमोठ्या अधिकारी पदावर बसलेले आहेत. नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये एकाच तालुक्यातील चार सुपुत्रांनी हा पदोन्नतीचा (Pramotion)लाभ मिळवला आहे.

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये ‘त्या’ महिलांसाठी बदल; मंत्री आदिती तटकरेंची माहिती  

माढ्याचे चार तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी (Madha News)

वेताळवाडीचे सुपुत्र किरण सुरवसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर सोलापूर येथे नियुक्ती झाली आहे. सध्या ते हवेली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.२००४ साली नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात प्रवेश घेतलेल्या सुरवसे यांनी रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. दारफळ सिना येथील प्रदीप उबाळे यांची नागपूर येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते याआधी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते. २०१४ साली राज्यसेवेत तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झालेल्या उबाळेंनी अल्पावधीतच आपल्या कामगिरीने प्रशासनात चांगली छाप सोडली आहे.

अवश्य वाचा: अमोल मिटकरींवर अजित पवारांनी दिली नवी जबाबदारी   

माढा तालुका पुन्हा चर्चेत (Madha News)

निमगाव (टे) चे सुपुत्र गणेश शिंदे सध्या बारामती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांची धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्रांतधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २००७ साली नायब तहसीलदार म्हणून सेवा सुरू केलेल्या शिंदेंनी विदर्भ, सांगली आणि बारामती भागात उत्कृष्ट कार्य केले आहे. तर लऊळ गावाचे सुपुत्र गणेश गोरे यांची पालघर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या गगनबावडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. २००३ साली नायब तहसीलदार म्हणून रुजू झालेल्या गोरेंनी शिस्तबद्ध आणि संवेदनशील अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या चौघा अधिकाऱ्यांच्या एकत्रित पदोन्नतीमुळे माढा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रामस्थ आणि शिक्षक वर्गातून  या चौघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.