
Devendra Fadnavis : आम्ही माणूस आहोत.आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू,असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी साधू संतांना केले आहे. नाशिक (Nashik News) येथे कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) कामांच्या शुभारंभ सोहळ्यातून ते बोलत होते. यावेळी सिंहस्थ सुरू होईपर्यंत एकूण २५ हजार कोटींची कामे पूर्णत्वास जातील,अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये ‘त्या’ महिलांसाठी बदल; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था केली जाणार (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ७५ वर्षानंतर त्रिखंड योग असल्याने यंदाचा कुंभ विशेष आहे. दीर्घकाळ हा कुंभ चालणार आहे. प्रयागराजला कुंभमेळा झाला. त्यात जगातील सर्वात मोठा आस्थेचा कुंभ भरला होता. याच परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ आहे. गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक येत असतात. प्रयागराजला १५ हजार हेक्टर जागा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकत्रित ५०० एकर जागा आहे. त्यामुळे कमी जागेत कुंभ भरवावा लागतो. मागील कुंभ ही यशस्वीरित्या पार पडला. यावेळी ५ पट जास्त भाविक येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा: अमोल मिटकरींवर अजित पवारांनी दिली नवी जबाबदारी
नाशिकमध्ये २५ हजार कोटींची विकासकामे (Devendra Fadnavis)
आम्ही नाशिकमध्ये २० हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. ती २५ हजार कोटी रुपयांची होतील. ६ हजार कोटींची कामे सुरू झाले आहेत. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम केल्याने मोठे काम होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांची मदत होत आहे. काही लोकांना विस्थापित व्हावे लागते. त्याला लोक तयार झाले. मी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी सांगितले आहे की, निधीची कमतरता भासू देणार नाही. १२ वर्षानी कुंभ येतो, त्यामुळे आम्ही काम करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.


