Kaal Bhairav ​​Temple : अकोलेतील कालभैरव मंदिरात दीपोत्सव साजरा

Kaal Bhairav ​​Temple : अकोलेतील कालभैरव मंदिरात दीपोत्सव साजरा

0
Kaal Bhairav ​​Temple : अकोलेतील कालभैरव मंदिरात दीपोत्सव साजरा
Kaal Bhairav ​​Temple : अकोलेतील कालभैरव मंदिरात दीपोत्सव साजरा

Kaal Bhairav ​​Temple : अकोले : शहरातील प्राचिन सिद्धेश्‍वर मंदिराजवळील (Siddheshwar Temple Akole) कालभैरव मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त (Kaal Bhairav ​​Jayanti) सालाबादप्रमाणे बुधवारी (ता.१२) शेकडो पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

अवश्य वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा

मंदिराला आकर्षक फुलांच्या माळांनी सजविले

अकोले शहरातील प्रवरा नदीच्या कडेला प्राचिन सिद्धेश्‍वर मंदिर असून इथे कालभैरवाचेही स्वतंत्र मंदिर आहे. कालभैरव जयंतीच्या निमित्ताने इथे दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. याहीवर्षी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे जलाभिषेक व महाआरती करण्यात आली. बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत म्हणून भाविक नैवैद्य दाखविण्याची परंपरा आहे. बुधवारी दिवसभर भाविकांनी नैवद्य दाखविण्याबरोबरच मंदिरात कालभैरवाष्टकाचे सामूहिक पठण केले. बटुकभैरव कवचाचेही पठण भाविक करीत होते. मंदिराला आकर्षक अशा फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींनी यामध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेत विविध धार्मिक कार्यक्रम केले.

नक्की वाचा : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले

दीपोत्सव पाहण्यासाठी अकोलेकरांची मोठी गर्दी (Kaal Bhairav ​​Temple)

या मंदिरात शनि महाराज व शीतलादेवी यांचेही भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. सिद्धेश्‍वर मंदिरातही भाविकांनी शिवलीला अमृताचेही पठण केले. सिद्धेश्‍वर मंदिर हे एक शिल्पकलेचा उत्तम नमुना असून सायंकाळच्या आरतीनंतर पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सर्व पणत्या प्रज्वलित झाल्यावर हे दृश्य पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती. हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्येही फोटो घेतानाची स्पर्धाच जणू इथे पाहायला मिळाली. असंख्य दिव्यांनी हा परिसर उजळून निघाला होता. भाविकांच्या हस्ते पणती पेटवून या दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पेटकर, सचिन नाईकवाडी, सचिन भालेराव, ऋतुराज वैद्य, योगेश अगस्ते, विनायक अगस्ते, सार्थक मंडलिक, संजय भुजबळ आदिंनी परिश्रम घेतले.