State Drama Competition : हास्यकल्लोळ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेला ‘मॉडरन फामिली’

State Drama Competition : हास्यकल्लोळ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेला ‘मॉडरन फामिली’

0
State Drama Competition : हास्यकल्लोळ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेला ‘मॉडरन फामिली’
State Drama Competition : हास्यकल्लोळ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेला ‘मॉडरन फामिली’

State Drama Competition : नगर : अहिल्यानगरमध्ये ६४व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेला (State Drama Competition) कालपासून (ता.१२) सुरुवात झाली. त्यामुळे सायंकाळ होताच नगरकर रसिकांची पाऊले आपोआप सावेडी उपनगरातील माऊली सभागृहाच्या दिशेने वळत आहेत. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता. १२) ‘मॉडरन फामिली’ या नाटकाने (Drama) प्रेक्षकांना खळखळून हसवले. सहज सरळ कथानक व बहारदार अभिनयाच्या जोरावर या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली.

अवश्य वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा

नवीन घर बांधण्याचा हट्ट याभोवती नाटकाचे कथानक फिरत

व्ही. डी. एम स्टुडिओज कृत ‘मॉडरन फामिली’ हे नाटक अहिल्यानगर फिल्म फाउंडेशन या संस्थेने सादर केले. विपुल महापुरुष लिखित व दिग्दर्शित हे नाटक रसिकांच्या पसंतीला उतरले. पडदा उघडताच सदानंद परचुरे उर्फ बाळू काका, (श्रेणिक शिंगवी) शुभेच्छा परचुरे उर्फ शुबू, (अद्वैता सुद्रिक) सुधा परचुरे, (उज्वला कुलकर्णी) अभिनंदन कुलकर्णी उर्फ गुड्डू, पमा काका (संकेत शहा) यांच्या जेवणाच्या दृश्याने नाटकाची सुरुवात होते. सदानंद परचुरे हे रिटायर्ड सरकारी अधिकारी त्यांची पत्नी, दोन मुले आणि अविवाहित चुलत भाऊ पम्या यांच्यासोबत वडिलोपार्जित घरात राहत असतात. रिटायर्ड बाळूकाका, कॉलेज कुमारी शुब्बू, जॉब करणारा पम्या काका आणि नाटकवेडा गुड्डू, शेजारचा बोबड्या (अजय घंगाळे) अशा हसत्या-खेळत्या मध्यमवर्गीय कुटुंबात सुधा परचुरे जेव्हा नवीन घर बांधण्याचा हट्ट करतात तेव्हा घडणाऱ्या गमती-जमती याभोवती नाटकाचे कथानक फिरत राहते. सुधा परचुरे यांना नवीन घर बांधण्यासाठी त्यांची बहीण संगीता (चिन्मयी खताळ) आणि बाबुराव भाऊजी (अक्षय म्हस्के) यांची फूस असते. त्या जेव्हा घर बांधण्यासाठी जास्तच हट्ट करतात तेव्हा बाळू परचुरे मनावर दगड ठेवून यासाठी संमती देतात. पम्या काका यासाठी नामांकित इंजिनियरला (तेजस आंधळे) बोलावतो. पण तो बाळूकाकाला अपमानित करतो. यावर पम्याकाका चिडून त्याला हाकलून देतो. पुढे घराचे बांधकाम बंडू घातकेला (अक्षय म्हस्के) मिळते. त्याचा सहाय्यक असलेल्या बबलूची (सोहम सब्बन) एंट्री धमाल उडवून देते. पुढे बांधकामासाठी परचुरे कुटुंबाला जेव्हा घर रिकामं करण्याची वेळ येते तेव्हा सदानंद परचुरे भावूक होतात. त्यांच्या या घरातील लहानपणीच्या आठवणी दाटून येतात. ते सर्व पाहून नवीन घरासाठी हट्ट करणाऱ्या सुधा परचुरे त्यांचा निर्णय रद्द करतात. मग हे घर असेच ठेवून दुसरीकडे घर बांधायचे असे सर्वानुमते ठरते. शेवटी कवयित्री विमल लिमये यांच्या ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती’ या कवितेच्या ओळी सर्वजण गातात नाटकाचा पडदा पडतो. सुधा परचुरेंची मॉडर्न वेशातील एंट्री, शेजारचा बोबड्या (अजय घंगाळे) याचे अफलातून टायमिंग आणि बबलू (सोहम सब्बन) याचा आंगिक अभिनय भाव खाऊन गेला. नाटकाच्या टायटल सॉंगवरील डान्सस्टेप्स आणि समर्पक संगीताला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.

State Drama Competition : हास्यकल्लोळ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेला ‘मॉडरन फामिली’
State Drama Competition : हास्यकल्लोळ आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेला ‘मॉडरन फामिली’

नक्की वाचा : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले

प्रेक्षकांची मने जिंकण्यात दिग्दर्शक यशस्वी (State Drama Competition)

प्रकाश योजना भारती लिमकर यांनी सांभाळली. अविष्कार ठाकूर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी चोख निभावली. नेपथ्य अनंत रिसे यांनी केले. रंगभूषा आबा सैंदाणे यांनी तर वेशभूषा भक्ती व ग्रीष्मा महापुरुष यांनी साकारली. नृत्य दिग्दर्शन सागर अलचिट्टी यांनी तर दिग्दर्शक विपुल महापुरुष यांनी नाटकाचा टायटल ट्रॅक लिहून संगीतबद्ध केला.


एकंदरीत विनोदी नाटक असल्यामुळे अफलातून टायमिंग आणि त्याला तांत्रिक गोष्टींची मिळालेली योग्य साथ यामुळे प्रेक्षकांची मने जिंकण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले.