Swachhta Campaign : नगर : अहिल्यानगर उपनगरातील प्रभाग ६ मध्ये नव्याने जोडलेल्या डौले हॉस्पिटल चौक ते रासने नगर चौक परिसरात महापालिका प्रशासन तसेच राष्ट्रवादी (NCP) ओबीसी विभाग शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर (Amit Khamkar) यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम (Swachhta Campaign) राबविण्यात आली. तसेच स्वखर्चातून जेसीबीच्या साहाय्याने अनेक दिवसांपासून साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता (Cleanliness) करण्यात आली. या कामामुळे परिसरातील दुर्गंधी, घाण आणि डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला हा भाग आता स्वच्छ आणि सुरक्षित होत असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
आठ दहा दिवसात ९० टन कचरा उचलला
गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. आता आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या आठ दहा दिवसात सुमारे ९० टन कचरा उचलण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर उपनगरातील प्रभाग ६ मध्ये नव्याने जोडलेल्या डौले हॉस्पिटल चौक ते रासने नगर चौक परिसरात तसेच एलटी अपार्टमेंटसमोरच्या नाल्याशेजारी मोठ्या प्रमाणावर असलेला कचरा उचलण्यात आला आहे.
अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी
स्वखर्चातून कचरा उचलून केली स्वच्छता (Swachhta Campaign)
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून येणारी दुर्गंधी, अस्वच्छता आणि डासांच्या त्रासामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांच्या अडचणी तातडीने लक्षात घेऊन राष्ट्रवादी ओबीसी विभाग शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांनी पुढाकार घेत महापालिकेशी समन्वय साधून तसेच स्वखर्चातून साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता केली. या कामामुळे परिसरातील दुर्गंधी, घाण आणि डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला हा भाग आता स्वच्छ आणि सुरक्षित होत असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.


