Nilesh Lanke : नगर : नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान (Mayor Election) घोडेबाजार करण्याचा प्रयत्न झाला. महायुतीकडून नगरसेवकांना अमिष दाखवली, फोन गेले, आर्थिक दबाव टाकला गेला. मात्र, आमचे नगरसेवक विकले गेले नाहीत. त्यांनी निष्ठा पाळली. त्यामुळेच आज डॉ. विद्या कावरे (Dr. Vidya Kaware) नगराध्यक्षपदी बसल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांनी पारनेर शहराला परिवारासारखे जपावे, पारनेर शहर हे तुमचा परिवार आहे. दररोज नगरपंचायतमध्ये या, लोकांच्या समस्या ऐका. चेहऱ्यावरील भाव पाहून नागरीकांच्या अडचणी ओळखा. शहरात फिरा, तक्रारी ऐका राजकारणाची डोक्यात हवा जाऊ देऊ नका, पद जनतेसाठी असते, स्वतःसाठी नाही, असे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हटले.
अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी
पदग्रहण समारंभात मोठ्या पार पडला उत्साहात
महाविकास आघाडीच्या डॉ. विद्या कावरे यांनी पारनेरच्या नगराध्यक्षपदी १७ पैकी ११ मते मिळवत विजय संपादन केला. नगरपंचायत कार्यालयात पदग्रहण समारंभात त्यांचा कार्यभार मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार निलेश लंके यावेळी बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, डॉ. विद्या कावरे, उपसभापती किसनराव सुपेकर, संध्या ठुबे, किशोर यादव, दादा शिंदे, चंद्रभान ठुबे, संदीप रोहोकले, दादा दळवी, अरूण पवार, डॉ. आबासाहेब खोडदे, चंद्रकांत कावरे, धोंडीभाऊ ठाणगे, वैभव गायकवाड, ॲड. पी.आर.कावरे, अमीत जाधव, बाळासाहेब नगरे, डॉ. सचिन औटी, सुभाष शिंदे, राजू शेख, ॠषीकेश गंधाडे, विजय भास्कर औटी, कारभारी पोटघन, बाजीराव कारखिले, सतीश भालेकर, सचिन गवारे यांच्यासह उपनगराध्यक्षा जायदा शेख, सुरेखा भालेकर, नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, सुप्रिया शिंदे, प्रियंका औटी, हिमानी नगरे, विद्या गंधाडे, नीता औटी आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
खासदार लंके म्हणाले, (Nilesh Lanke)
नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान घोडेबाजार करण्याचा प्रयत्न झाला. महायुतीकडून नगरसेवकांना अमिष दाखवली, फोन गेले, आर्थिक दबाव टाकला गेला. मात्र, आमचे नगरसेवक विकले गेले नाहीत. त्यांनी निष्ठा पाळली. त्यामुळेच आज डॉ. विद्या कावरे नगराध्यक्षपदी बसल्या आहेत. फटाके विरोधकांनी आणले, हेलीपॅड तयार केले, पण विजय मात्र, निष्ठावंतांच झाला, असा टोला त्यांनी लगावला.



