Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : नितीन वानखेडे

Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : नितीन वानखेडे

0
Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : नितीन वानखेडे
Child Marriage : बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : नितीन वानखेडे

Child Marriage : नगर : अहिल्यानगर येथील लालटाकी परिसरात आज (ता. १४) रोजी बालदिन व पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (Pandit Jawaharlal Nehru Jayanti) साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेले बालविवाह (Child Marriage) जनजागृती मोहीमेची सुरुवात करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे, असे आवाहान प्रकल्पाचे व्यवस्थापक नितीन वानखेडे (Nitin Wankhede) यांनी केले आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

यावेळी उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी संजय कदम, बाल कल्याण समितीच्या सदस्य अनुराधा येवले, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, हनीफ शेख, शुभांगी रोहाकले, संदेश चव्हाण, महेश येठेकर आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी

यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी (Child Marriage)

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. यावेळी लालटाकी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन बालभवन येथील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी, विप्ला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी करण्यात आली.