Local Crime Branch : नगर : श्रीरामपूर तालुक्यात गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणारे तिघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली. त्यांच्याकडून ७ लाख ८२ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : तुम्ही सगळे वाघ पकडून पिंजऱ्यात टाका; मुलांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
आनंदा यशवंत काळे (वय-४४,रा. रेणुकानगर ५१ नं. रेल्वे गेट जवळ, श्रीरामपूर), विशाल बबन सोज्वळ (वय – २८,रा.श्रीरामपूर), विजय यशवंत काळे (वय- ४८, रा. निलकंठ ड्रिमस् शांताई रेसिडेन्सी शेजारी, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
७ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी घेऊन चारचाकी मधून बेलापूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बेलापूर परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी कट्टा चार काडतुसे असा एकूण ७ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, संतोष खैरे, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ, रमिझराजा आतार, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



