Leopard Attack : अहिल्यानगर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; मुलगा जखमी

Leopard Attack : अहिल्यानगर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; मुलगा जखमी

0
Leopard Attack : अहिल्यानगर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; मुलगा जखमी
Leopard Attack : अहिल्यानगर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा हल्ला; मुलगा जखमी

Leopard Attack : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा (Leopard) वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने येथे ५ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला यात निष्पाप मुलीने जीव गमावला. ही घटना ताजी असतानाच काल (ता. १४) सायंकाळी इसळक (Islak) गावात पुन्हा बिबट्याने ८ वर्षांच्या मुलावर हल्ला केला आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

सुदैवाने मुलगा बिबट्याच्या तावडीतून निसटून पळाला

त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दैव बलवत्तर म्हणून हा चिमुरडा बिबट्याच्या तावडीतून सुटला आहे. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने नगरमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.राजवीर रामकिसन कोतकर (वय ८) असे या बालकाचे नाव असून, इसळक शिवारातील मंदिर वैष्णोदेवी परिसरात असलेल्या कोतवर वस्तीवर ही घटना घडली. रामकिसन एकनाथ कोतकर यांचा हा मुलगा असून, तोही घराजवळ खेळत असतानाच बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. मात्र, सुदैवाने हा मुलगा बिबट्याच्या तावडीतून निसटून पळाला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बिबट्याला तत्काळ पकडण्याची ग्रामस्थांची मागणी (Leopard Attack)

दरम्यान, काल खारे कर्जुने भागातील रियंका सुनील पवार या मुलीचा बळी घेणारा बिबट्या अजून वन विभाग किंवा रेस्क्यु टीमला सापडलेला नाही. त्याच्या शोधात के. के. रेंज भागात फिरणाऱ्या पथकाने आज ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या इसळक परिसरात धाव घेतली. तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. काल झालेल्या घटनेच्या निषेधार्थ खारेकर्जुने गाव बंद ठेवण्यात आले होते. बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यंत त्या चिमुरडीचा अत्यविधी करणार नाही, असाही पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. केवळ आश्वासनावर अंत्यविधीचे सोपस्कर पार पडले. मात्र, तो बिबट्या सापडण्याआधीच पुन्हा खारे कर्जुने येथून पाच-सहा किलोमीटर अंतर असलेल्या इसळक गावात ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला तत्काळ पकडावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.