Accident : नगर-मनमाड महामार्गावर बस व कारचा भीषण अपघात; कारचालकाचा होरपळून मृत्यू

Accident : नगर-मनमाड महामार्गावर बस व कारचा भीषण अपघात; कारचालकाचा होरपळून मृत्यू

0
Accident : नगर-मनमाड महामार्गावर बस व कारचा भीषण अपघात; कारचालकाचा होरपळून मृत्यू
Accident : नगर-मनमाड महामार्गावर बस व कारचा भीषण अपघात; कारचालकाचा होरपळून मृत्यू

Accident : कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) टाकळी फाटा येथे लक्झरी बस व एका कारचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला. या अपघातात (Accident) कारला लागलेल्या आगीत कार चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी नगर- मनमाड महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

याबाबत मिळालेली माहिती अशी की,

कोपरगावहून येवल्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगाव कडे जाणारी कार या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी इतकी भीषण होती की कारला आग लागली. त्या आगीत कार चालकासह कार पूर्ण जळून खाक झाली. कार चालक विंचूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर-मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा (Accident)

यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशनम दलाला तात्काळ माहिती दिली. कोपरगाव नगर पालिका अग्निशमन दल, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, येवला नगर पालिका अग्निशमन दलाचे बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नगर-मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी बस मधील प्रावशांना वाचवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यावेळी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर होऊन वाहतूक सुरळीत करत घटनेचा पुढील तपास करत आहेत.