Nivedita Saraf: मी कट्टर बीजेपी;अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात वक्तव्य

0
Nivedita Saraf: मी कट्टर बीजेपी;अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात वक्तव्य
Nivedita Saraf: मी कट्टर बीजेपी;अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात वक्तव्य

नगर: मी कट्टर बीजेपी (Hardline BJP) असल्याचं वक्तव्य अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी केलं आहे. त्यावर, ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी त्यांचे आभार मानत देश भाजपमय (BJP) करायचा असल्याचं म्हटलं. यंदाचा गंधार गौरव पुरस्कार हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना त्यांचेच पती आणि ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी रात्री ठाण्यातील (Thane) गडकरी रंगायतन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

नक्की वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार मोफत मातीसह गाळ आणि मुरूम 

निवेदिता सराफ यांचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान  (Nivedita Saraf)

गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह आणि ११ हजार १११ रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला गंधार बाल कलाकार पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी संगितकार अशोक पत्की, आमदार संजय केळकर, अभिनेते विजय पाटकर, मंगेश देसाई, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रदीप ढवळ, गंधारचे मंदार टिल्लू आणि विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा: मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी   

‘मी कट्टर बीजेपी’ – निवेदिता सराफ  (Nivedita Saraf)

याप्रसंगी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या की, आज जी मी काही आहे ते माझे गुरु, माझे पती अशोक सराफ यांच्यामुळेच आहे, आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाला,असे म्हणत आपण राजकीय भूमिकेतून भाजपच्या समर्थक असल्याचं त्यांनी जाहीर केलं. माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरुवात बालरंगभूमी पासून झाली. सुधा करमरकर माझ्या गुरू, त्यांच्या संस्थेत अनेक बालनाट्य केलं. मला स्टेजवर उभे राहायला कोणी शिकवले तर ते सुधाताईंनी. त्या काळात रत्नाकर मतकरी, सुधाताई हे सातत्याने बालनाट्य करत, महाराष्ट्रभर दौरे करत अशी आठवण त्यांनी सांगितली.

बालनाट्य करणे कठीण पण काळाची गरज आहे, बालनाट्यात आपण उद्याचे चांगले प्रेक्षक घडवत असतो. नाटक कसे बघितले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते, चांगले प्रेक्षक बनतात. त्यामुळे बालनाट्य शिबिरे घेतली पाहिजे. माझी वाटचाल बाल रंगभूमीपासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे, असे वाटत असल्याचंही निवेदिता सराफ यांनी म्हटलं आहे.