Crime Filed : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल 

Crime Filed : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल 

0
Crime Filed : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल 
Crime Filed : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल 

Crime Filed : नगर : लग्नाचे आमिष दाखवून एका (वय १७) अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर, तरूणाने लग्नास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तरूणावर कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास अनिल जंगम (रा. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल (Crime Filed) झालेल्या तरूणाचे नाव आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

पीडितेच्या इच्छेविरूध्द बळजबरी

पीडित मुलीची विकास जंगम सोबत ओळख झाल्याने त्यांच्यात बोलणे वाढवले. यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सुमारे एक वर्षापूर्वी, विकासने पीडितेला मी तुझ्यासोबत लग्न करील, असे आश्वासन दिले व पीडितेसोबत शरीरसंबंधाची मागणी केली. पीडितेने सुरूवातीला नकार दिला असता, मी लग्न करणारच आहे, असे सांगून त्याने पीडितेच्या इच्छेविरूध्द बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जिवंत ठेवणार नाही अशी धमकी (Crime Filed)

या सततच्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने ही गोष्ट विकासला सांगितली असता, त्याने तिला १३ ऑक्टोबर रोजी माळीवाड्यातील एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी पीडिता गर्भवती असल्याची खात्री केल्यानंतर, विकासने तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. घाबरलेल्या पीडितेने काही दिवस हा प्रकार लपवून ठेवला, परंतु अखेर तिने घडलेली सर्व हकीकत तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.