AESA : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एसा’ संघटनेकडून १ लाख ५५ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

AESA : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'एसा' संघटनेकडून १ लाख ५५ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

0
AESA : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'एसा' संघटनेकडून १ लाख ५५ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
AESA : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 'एसा' संघटनेकडून १ लाख ५५ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

AESA : नगर : राज्यातील अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (AESA) अहिल्यानगर या संस्थेने सामाजिक उत्तरदायित्व जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister’s Relief Fund) १ लाख ५५ हजार रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. संस्थेने सभासदांकडून स्वयंस्फूर्तीने रक्कम जमा करून हा उपक्रम राबविला आहे.

नक्की वाचा : ‘महाराज तुम्ही फेटा खाली उतरवायचा नाही’; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात

‘एसा’ चा सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार

अहिल्यानगर शहरातील आर्किटेक्ट इंजिनीअर्स आणि सर्व्हेअर्स यांच्या तांत्रिक व प्रशासनिक विषयांवर मार्गदर्शन करण्यासोबतच सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारी संस्था म्हणून एसा ओळखली जाते. शेतकरी बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि आर्थिक सावरण्यासाठी हा निधी सहाय्यक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अवश्य वाचा : प्राध्यापकाची अडीच लाखांची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांv पंकज आशिया यांनी मानले आभार (AESA)

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित देवी, सचिव भूषण पांडव, उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, संचालक सुनील औटी, आदिनाथ दहिफळे, सुनील जाधव, गौरव मांडगे, जितेश सचदेव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेने आपत्तीग्रस्तांसाठी दाखवलेल्या संवेदनशीलते बद्दल जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आभार मानले.