Radhakrishna Vikhe Patil : शहराच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार : पालकमंत्री विखे

Radhakrishna Vikhe Patil : शहराच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार : पालकमंत्री विखे

0
Radhakrishna Vikhe Patil : शहराच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार : पालकमंत्री विखे
Radhakrishna Vikhe Patil : शहराच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार : पालकमंत्री विखे

Radhakrishna Vikhe Patil : नगर : अहिल्यानगर  शहराला नवी दिशा देण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत शहर पुढे न जाता मागे जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी मी आता व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहे. शहराचे चित्र बदलण्यासाठी महापालिकेत भाजपची (BJP) सत्ता येणे आवश्यक आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या (Municipal Elections) उमेदवारीसाठी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. मात्र, उमेदवारी मागणाऱ्यांनी आपापल्या भागाचे व्हिजन डॉक्युमेंट करून काय विकास करणार आहे, याचा लेखाजोखा पक्षाकडे द्यावा. त्यावर विचार करूनच उमेदवारी निश्चीत केली जाणार आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई

भानुदास कोतकर यांची व्यासपीठावर उपस्थिती

अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपमहापौर अनिल बोरुडे व पुष्पा बोरुडे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख जालिंदर वाघ, युवा सेनेचे प्रमुख महेश लोंढे आदींनी प्रवेश केला. या कार्यक्रमास शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मेळावा सुरू असताना नगर तालुका बाजार समितीचे माजी सभा भानुदास कोतकर हे व्यासपीठावर आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी हस्तदोलन केल्यावर माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी त्यांचा सत्कार केला.

नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई

यावेळी विखे म्हणाले, म

बिहार निवडणुकीच्या विजयाने सर्वत्र आनंदाची लेहर आली आहे. भाजप येणारी महापालिका निवडणूक पूर्ण ताकतीने लढून प्रत्येक प्रभागात शत प्रतिशत भाजप करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी यांनी कामाला लागावे. महायुती होईल की, नाही हे अद्याप निश्चित नाही. भाजप कोणावर अवलंबून नाही तर इतर पक्ष भाजपवर अवलंबून आहेत. हे सिद्ध करून द्यायचे आहे, असे त्यांनी म्हटले. 

शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

महापालिका निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असून त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कटिबद्ध आहेत. शत प्रतिशत भाजप हे या निवडणुकीचे आमचे उद्दिष्ट आहे. बिहार निवडणुकीच्या विजयाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साह वाढला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका जिंकण्यासाठी या मेळाव्यातून आपण रणशिंग फुकत आहे. 

यावेळी अनिल बोरुडे म्हणाले, भाजपाची देशभर मोठ्या प्रमाणात घोडदौड होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा वेगाने विकास करत आहेत. त्यांच्या या विकास कामांनी प्रभावीत होऊन मी भाजपात प्रवेश करत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करणार आहे, असे सांगितले.